Khed : सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकाकडे केली खंडणीची मागणी; शिवीगाळ करत केली मारहाण

एमपीसी न्यूज – सिगारेट का देत नाही म्हणत (Khed) शिवीगाळ करत, हप्ता देण्याची मागणी करत दोघांनी टपरी चालकाला मारहाण करण्यात आली आहे, ही घटना शनिवारी (दि.2) खेड येथे घडली आहे,

याप्रकरणी मनोहर मारुती बेनगुडे (वय 29 रा.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून रोहीत घोडे व ओंकार पऱ्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mp Shrirang Barne : किवळे-विकासनगर भागातील अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पान टपरीवर बसले होते. यावेळी आरोपी हे तेथे आले व त्यांनी आम्हाला सिगारेट का देत नाही आम्ही इथले भाई आहोत. तुला माहिती नाही का . आम्हाला महिन्याला (Khed) एक हजार रुपये हप्ता द्यायचा म्हणत आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व तेथील लोखंडी पाईप तेथे असलेल्या दुसऱ्या नागरिकाच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच परिसरातील इतर व्यापाऱ्यांना ओरडून आम्हाला हप्ता दिला नाही तर कोणालाच धंदा करु देणार नाही म्हणत दहशत पसरवली. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.