Indapur : मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची मित्र पक्षांकडूनच धमकी

एमपीसी न्यूज : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Indapur) यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी भाजपच्या मित्र पक्षांकडून आल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले आहे. आपल्या जीवाला धोका असण्याचे पत्र त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. 

या पत्रात हर्षवर्धन पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात आपल्या युतीचे सरकार योग्य प्रकारे काम करत आहे. परंतु, इंदापूर मध्ये भाजपच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी मेळावे आणि विविध भाषणांमधून माझ्यावर शिवराळ भाषेत वक्तव्य करत असून त्यांनी मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी दिली आहे.

Khed : सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकाकडे केली खंडणीची मागणी; शिवीगाळ करत केली मारहाण

सुरक्षेची चिंता वाटत असल्याचे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले असून ही बाब गंभीर (Indapur) असून यात तात्काळ लक्ष द्यावे अशी विनंतीही हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस यांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.