Dighi : रंगावरून, पैशांवरून विवाहितेचा छळ; इमारतीवरून उडी घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – तुझा रंग काळा आहे  (Dighi) म्हणत विवाहितेचा मानसिक छळ केला. सासरच्यांच्या या छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने इमारतीवरून उडी मारत आपले आयुष्य संपवले आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.3) डुडुळगाव येथील कल्पवृक्ष अपार्टमेंट येथे घडला आहे,

याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, यावरून पती सुरेंद्र धर्मेंद्र शेटे, दीर आकाश शेटे व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तो नोकरीला आहे, असे खोटे पीडितेच्या घरच्यांना सांगून तिच्याशी विवाह केला. मात्र डिसेंबर 2021 पासून पती व त्याच्या घरच्यांनी पीडितेला पैशांवरून व तिच्या रंगावरून तिचा छळ करण्यास सुरुवात केली.

शिवीगाळ, मारहाण या सततच्या मानसिक व शारीरिक (Dighi) त्रासाला कंटाळून विवाहितेने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.