Pune : जानकर हे भाजप बरोबर आहेत; ते कुठेही जाणार नाहीत – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – जानकर हे भाजप बरोबर आहेत ते कुठे ही ( Pune) जाणार नाहीत हे छाती ठोकून सांगतो. त्यांचे जे काही म्हणणे आहे .त्यासाठी देवेंद्रजी त्यांच्या प्रश्नांचे समाधान करतील ,असे चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितले.

पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची रणनीती  निश्चित केली जाणारअसून  त्यादृष्टीने बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरचे प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज  बैठक आयोजित केली आहे .  महायुतीमधील सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून सायंकाळीपर्यंत ही बैठक चालणार आहे. या बैठकीला जाताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

ते म्हणाले, महादेव जानकर हे भाजप बरोबर आहेत ते कुठे ही जाणार नाहीत हे छाती ठोकून सांगतो. त्यांचे जे काही म्हणणे आहे . त्यासाठी देवेंद्रजी त्यांच्या प्रश्नांचे समाधान करतील.आता लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेलं असून 16 पक्ष ज्या मध्ये 3 मोठे पक्ष आणि इतर मित्र पक्ष बूथ लेव्हलपर्यंत कसं पोहचता येईल हे या बैठकीत ठरविले जाणार आहे.

Dighi : रंगावरून, पैशांवरून विवाहितेचा छळ; इमारतीवरून उडी घेत महिलेची आत्महत्या

पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी आम्हाला प्रत्येक बूथवर 370 मतांचे टार्गेट दिलं आहे. या आधीच्या बूथ वर येणारी जी मते आणि त्यावर आणखी 370 जोडणे हे  आमच्यासाठी  महत्त्वाचे आहे, असेही ते ( Pune) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.