Akurdi : कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

एमपीसी न्यूज –  आकुर्डी येथील संत तुकाराम व्यापार ( Akurdi)  संकुला जवळील सार्वजनिक उद्यानात काही अज्ञात व्यक्तींडून कचऱ्यास आग लावली जाते. विशेष म्हणजे त्या उद्याना जवळच आरोग्य विभागाचे कार्यालय सुद्धा आहे. वारंवार तेथील कचऱ्याला लागणाऱ्या त्या आगीमुळे तिथे दुर्घटनेची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पुन्हा सोमवारी पहाटे कचऱ्यास अज्ञात व्यक्तीकडून आग लावण्यात आली. त्यामुळे तेथील परिसरात कचऱ्याचा धूर पसरून वायू प्रदूषण होते. तसेच त्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्या धुराचा त्रास होत होता. उद्यान नेहमी उघडेच असते. कारण त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाही.

Pimpri : ‘सुलतान्स ऑफ सिंध’ पाचव्या सिंधी प्रीमिअर लीगचा विजेता

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कचऱ्यास वारंवार आग लावली जात आहे. त्या लागलेल्या कचऱ्याच्या आगीमुळे  धूर पसरतो.  मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना श्वसन विकार समस्या व इतर आरोग्याच्या समस्या उद्भवतात. महापालिकेने यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून संबंधितावर गुन्हे दाखल करत तात्काळ कारवाई करावी,  अशी मागणी सामाजिक ( Akurdi)  कार्यकर्ते शिवानंद चौगुले यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.