Bhosari News : मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलचे कराटे आणि किकबॉक्सिंगमध्ये दैदिप्यामान यश 

एमपीसी न्यूज – भोसरीतील मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजयाची परंपरा राखत मेहनत व अथक प्रयत्नाने कराटे आणि किकबॉक्सिंगमध्ये (Bhosari News) दैदिप्यामान यश प्राप्त केले आहे. नॅशनल कराटे फेडरेशन ऑफ़ इंडियाद्वारे आयोजित इंटरनॅशनल कराटे व किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत भाग घेत शाळेतील विद्यार्थी श्रीजीत सरपटे (इयत्ता 9 वी) याने सहभाग नोंदवत कीकबॉक्सिंग आणि कराटेमध्ये प्रथम स्थान मिळवत सुवर्णपदक पटकावले.
ही स्पर्धा नेताजी सुभाषचंद्र बोस मिलट्री स्कूल फूलगाव पुणे येथे घेण्यात आली होती. गेली 8 वर्ष श्रीजीत आपल्या मेहनतीने या खेळात उत्कृष्ठरित्या आपले क्रीड़ा प्रदर्शन करत आहे. एम. एम. जी. इ. एस नेहमी आपल्या विद्यार्थी वर्गाला पाठिंबा देऊन उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन देत असते.
भोसरी मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नेहमीच विविध क्षेत्रात आपल्या कलागुणांचे उत्तम प्रदर्शन करत असतात व यश मिळवत असतात. नेहमी प्रमाणेच  शाळेतील (Bhosari News) विद्यार्थी याने  नॅशनल कराटे फेडरेशन ऑफ़ इंडियाद्वारे आयोजित इंटरनॅशनल कराटे व किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये सहभाग घेतला होता.

श्रीजीत सरपटे याने त्याच्या प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत व त्याची चिकाटी या जोरावर हे यश खेचून आणले. Educate Explore Excel या शाळेच्या ब्रिदवाक्यानुसारच येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारिरिक, वैयक्तिक, नैतिक आणि अध्यात्मिक कला गुणांना वाव दिला जातो. नितीमूल्ये ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग आहेत. जी विदयार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा सन्मान करण्यास व समाजाला आकार देण्यास मदत करतात. त्यामुळे मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूल मुलांना जगाबद्दल अंतदृष्टि विकसित करण्यास व विदयार्थ्यांचे स्वारस्य असणाऱ्या क्षेत्रात पुढे जाण्यास मदत करते. केवळ खेळच नव्हे, तर शाळेतील (Bhosari News) अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
श्रीजीत सरपटे याच्या यशामध्ये संस्थापक जयश्री गवळी, मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर, प्रशंसक मणिकड़न नायर तसेच शाळेचे क्रीड़ा शिक्षक यांचा देखील मोलाचा सहभाग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.