Bhosari : घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला

एमपीसी न्यूज – भोसरी येथे एक विचित्र प्रकार (Bhosari) घडला आहे घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. ही घटना रविवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजता भोसरी रोड येथे घडली.

याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात ओंकार त्रिंबक भोसले (वय 29 रा भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीवरून भोसरी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri: विक्रीसाठी आणलेल्या गुटख्यासह  तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा राहिला असता, कुणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश केला व त्याने फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातून दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना (Bhosari) उघडकीस आली असता फिर्यादी यांनी भोसरी पोलिसात तक्रार दिली. भोसरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.