Bhosari : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून (Bhosari) महिलेला चार जणांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.4) भोसरी येथे घडली आहे.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून यासीन शेख, अरमान शेख, व दोन महिला आरोपी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : हिंदू देवतांचा अपमान पुणेकर खपवून घेणार नाहीत -सुनील देवधर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी घरासमोरील चूल मोडून पाणी सांडले याचा जाब फिर्यादी यांनी विचारला. याचा राग येवून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत डोक्यात वीट मारून जखमी केले. यावेळी फिर्यादीच्या सासू दिर यांनाही आरोपींनी हाताने मारहाण केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.