Moshi: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

एमपीसी न्यूज –  इंद्रायणी नदी काठच्या गावातील  मैला मिश्रित( Moshi)सांडपाणी तसेच कारखान्यातील रसायन युक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते सांडपाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते.
यामुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत (Moshi)आहे. आज दि.6 रोजी सुद्धा इंद्रायणी नदी जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून येत होती.
मोशी येथील बंधाऱ्यातून नदीपात्रात पडलेल्या  पाण्याने तेथील नदीपात्र मोठ्या प्रमाणात फेसाळलेले दिसून आले.तेथील नदीपात्रातील पाण्यावर पांढरा शुभ्र फेस तरंगल्याने तो बर्फ असल्याचा भास निर्माण होऊन तिने हिम नदी चे स्वरूप धारण केल्यासारखे वाटत होते.या फेसळलेल्या नदीपात्राचे व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

जलप्रदूषणा मुळे इंद्रायणी नदी वारंवार फेसाळलेली दिसून येत आहे. जलप्रदूषणा मुळे नदी लगत असणाऱ्या छोट्या मोठ्या कुपनलिकेवर परिणाम होत आहेत.त्यांचे देखील जल प्रदूषित होत आहे. नदी काठच्या गावांना सुध्दा ह्या जलप्रदूषीत पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच नदीपात्रातून शेतपंपा द्वारे विविध पिकांना हे पाणी दिले जाते.ती पिके मानवासह पशु पक्षी व इतर प्राणी त्याचा अन्न म्हणून वापर करतात.दुरोगामी विचार करता त्या पिकांमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषीत पाण्यामुळे  विविध त्वचारोग ही मनुष्यास संभवतात.
इंद्रायणी नदीपात्र वारंवार जलप्रदूषणाने फेसाळलेले दिसून येत आहे.हे जलप्रदूषण करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कठोर कारवाई करावी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.