BJP : अजित पवारांवरीलही काही गुन्हे कमी झालेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांना टोला

एमपीसी न्यूज : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या (BJP) कार्यकाळात भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या कथित बँक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट देण्यात आली. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्याकडून भाजपवर टीका केली जात आहे. त्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, एखादा गुन्हा आकसाने दाखल झाला आणि तपासात काही मिळाले नसेल त्यामुळे गुन्हा कमी झाला असणार आहे. तसेच मागील काळात अजित पवार यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले होते. त्यातील काही गुन्हयात तपासात काहीच आढळले नाही. त्यामुळे त्याच्यावरील गुन्हे कमी झाले असल्याचे सांगत अजित पवार आणि विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील खडकवासला आणि शिवाजीनगर येथील भांडारकर इन्स्टिट्यूट टिफीन बैठकीस हजेरी लावत डब्यातील जेवणाचा आस्वाद घेतला. या बैठकीला भाजपचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वाशी त्यांनी संवाद देखील साधला. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधताना त्यानी राज्यातील घडामोडी बाबत देखील भाष्य केले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या खिशात पेन नव्हता. त्या दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार भेटून सांगायचे की, अजित पवार सकाळपासून कामाला सुरुवात करतात. तर आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात येत नाहीत.

आमच्या पत्रावर आणि फाईलवर सहा सहा महिने सह्या होत नाहीत. त्यामुळे (BJP) आम्ही 65 वरून 10 वर आल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी आमदाराच्या मनामध्ये ती भावना होती. उद्धवजी आपले 75 टक्के आमदार नाराज असून त्यांच्याकडे लक्ष द्या, अस त्यावेळी वारंवार त्यांना सांगत होतो.

पण उद्धव ठाकरे हे आदित्यच्या प्रेमात पडले होते. तसेच त्यांच्या अलिखित करार झाला होता. 2019 ते 2024 पर्यत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असा झाला होता. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना संपवयाची ठरवलं होत. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री होते. त्या ठिकाणी शिवसेना संपवण्याच काम सुरू होते.

त्यामुळे पुन्हा आपण निवडून येऊ की नाही. ती भीती शिवसेनेच्या आमदारामध्ये होती. शिवसेनेकडे कोणता चेहरा आहे. या अशा भीतीमुळे सरकार बदलले आणि ओके बोके वैगरे काही नाही. त्यामुळे सत्ता परिवर्तन झाले असल्याची भूमिका देखील यावेळी त्यांनी मांडली.

तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात भाजप आणि शिवसेना चांगल्या प्रकारे काम करीत (BJP) आहे. त्यामुळे आगामी काळात आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढणार असून या दोन्ही निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पेक्षा शिवसेनेचे उमेदवाराना कसे निवडून येतील. त्यासाठी 10 टक्के ताकद अधिकची लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chinchwad : प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचा ‘दशकपूर्ती’ सोहळा उत्साहात साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.