Bopkhel : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिघी, बोपखेलमध्ये कडकडीत बंद

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिघी, बोपखेल येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. रुग्णवाहिका, औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवाच आज दिवसभर सुरू होत्या. आज नागरिकांनी भगवे झेंडे हातात घेऊन परिसरात रॅली काढली. रॅलीमध्ये महिलांनी देखील मोठया संख्येने सहभाग घेतला. दरम्यान, मराठा आरक्षण न मिळाल्यास सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला.

दिघी, बोपखेलसह रामनगर, गणेशनगरमध्ये देखील बंद पाळण्यात आला. शेकडो कार्यकर्ते यावेळी एकत्र जमले. मराठा क्रांती मोर्चामध्ये मरण पावलेल्या मराठा बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिघी आणि बोपखेल मधील कार्यकर्त्यांनी दिघी आणि भोसरी पोलिसांना निवेदन दिले. शासकीय कार्यालये आणि अत्यावश्यक सेवा या व्यतिरिक्त कोणतीही दुकाने अथवा कार्यालये सुरू करण्यात आली नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.