Chakan : पंच प्रण शपथ घेण्यासाठी निघालेल्या पोलीस अंमलदाराचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – चाकण वाहतूक विभागातील (Chakan) पोलीस अंमलदार योगेश गणपत ढवळे (वय 40) हे सकाळी दहा वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात पंच प्राण शपथ घेण्यासाठी जात असताना त्यांचे अपघाती निधन झाले. ही घटना बुधवारी (दि. 9) एचपी पेट्रोल पंपाजवळ घडली.

योगेश ढवळे हे चाकण वाहतूक विभागात कार्यरत होते. बुधवारी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चाकण मधील माणिक चौकात त्यांना ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर हजर होऊन ते सकाळी दहा वाजताच्या सुमारास चाकण वाहतूक विभागाच्या कार्यालयात पंच प्रण शपथ घेण्यासाठी त्यांच्या दुचाकी (एमएच 14/जेएल9936) वरून जात होते.

Mumbai : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या कारण..

चाकणमधील एच पी पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर ढवळे यांच्या दुचाकीला एका डंपरने (एमएच 14/जेएल 9936) धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या (Chakan) निधनाबद्दल शहर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.