Mumbai : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; जाणून घ्या कारण..

एमपीसी न्यूज : महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Mumbai) यांना मुंबईतील सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून आपल्या समर्थकांना ही माहिती दिली. 

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे, की स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मला सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. कारण मी 9 ऑगस्ट रोजी म्हणजे आज ‘भारत छोडो दिना’च्या स्मरणार्थ घरातून निघालो होतो. मला अभिमान आहे माझे आजोबा बापू आणि बा यांनाही आजच्या ऐतिहासिक तारखेला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती.

Maharashtra : दहावी-बारावीचा 17 नंबर फॉर्म भरण्याची प्रक्रिया जाहीर

शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तुषार गांधी यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, नंतर तुषार गांधी यांनी ट्विट केले की, पोलिसांनी आता त्यांना जाण्याची परवानगी दिली आहे. ते ऑगस्ट क्रांती मैदानाकडे निघाले आहेत.

खरे तर दरवर्षी ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वर्धापनदिनानिमित्त (Mumbai) गिरगाव चौपाटीवरील टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत लोकचळवळ म्हणून मोर्चा काढला जातो. पोलिसांनी तुषार गांधी आणि तीस्ता सेटलवाड यांना बुधवारी सकाळी मोर्चात सहभागी न होण्यास सांगितले होते.

नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह 50 समर्थकांनाही ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर तिस्ता सेटलवाड यांना घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. तीस्ता सेटलवाड यांनी ट्विट केले की, मला मोर्चात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी माझ्या घराबाहेर 20 पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.