Maharashtra : दहावी-बारावीचा 17 नंबर फॉर्म भरण्याची प्रक्रिया जाहीर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2024 मध्ये दहावी (Maharashtra) आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होण्यासाठी 17 नंबरचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बारावीसाठी 10 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर, दहावीसाठी 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना खासगीरित्या परीक्षा देण्याची संधी दिला जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांना 17 नंबरचा अर्ज आणि शुल्क भरावे लागते. विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्क भरल्याची पावती दोन प्रतीत, मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर, दहावीच्या विद्यार्थ्यांना 17 ऑगस्ट ते 13 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयांना विद्यार्थ्यांनी भरलेला अर्ज, शुल्काची पावती, मूळ कागदपत्रे आणि विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे 15 सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक असल्याचे मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune : आशिष बंगिनवार यांच्या नावावर शाई फेकून रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी नोंदवला निषेध

विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, दाखला नसल्यास द्वितीय प्रत आणि प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ही कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे अनिवार्य आहे.

विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रत ई-मेल आयडीवर पाठवली  (Maharashtra) जाणार आहे. या अर्जाची प्रत, शुल्क भरल्याची पावती, हमीपत्र आदींची छायाप्रत प्रत्येकी दोन प्रतीत काढून ठेवावी, असे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.