Chakan Crime News : गळ्याला चाकू लावून लुटले

एमपीसी न्यूज – गळ्याला चाकू लावून तिघांनी एकाला ( Chakan Crime News )लुटले आहेत. हा प्रकार शेलपिंपळगाव शुक्रवारी (दि.6) भामा नदीजवळ घडला आहे.

प्रमोद शिवराम नलावडे (वय 45 रा. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जात असताना आरोपी हे दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला गळ्याला चाकू लावून धमकावले, तसेच जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील 8 हजार रुपये रोख 2 हजार रुपयांचा मोबाईल दहा हजार रुपयांचा ऐवज तसेच पॅनकार्ड, आधार कार्ड,मतदान कार्ड, फोरव्हिलर लायसन्स चोरले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला (Chakan Crime News )असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.