Talegaon Dabhade : ट्रेलर गाडीची चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज पेट्रोल पंपावर थांबलेल्या टाटा कंपनीच्या ट्रेलर गाडी चोरणाऱ्या दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी आठ दिवसात अटक केली आहे. (Talegaon Dabhade) ही चोरी सोमाटणे येथील लडकत पेट्रोल पंपावर 31 डिसेंबर रोजी करण्यात आली होती.

जसबिरसिंग राजेंद्रसिंह विलखु (वय 35 रा.मुंबई) यांनी शनिवारी (दि.7) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुरु शरनजित सिंग सोहल व गुरुप्रितसिंग जसविंदर चढाव (दोघे रा,कळंबोली मुंबई) अशी अटक आरोपीची नावे आहेत.

Hinjawadi News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आरोपींनी 31 डिसेंबर रोजी दुपारनंतर पेट्रोल पंपावरून (Talegaon Dabhade) 4 लाख रुपये किंमतीचा एन.एल.01 के 7701 हा ट्रेलर चोरून नेला होता. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.