Chakan : चाकण औद्योगीक परिसरातील समस्यांसाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतली बैठक

एमपीसी न्यूज – चाकण आद्योगीक परिसरात ( Chakan) तळेगावचौक व आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडी होत आहे, रहिवासी भाग वाढल्याने काही इतर समस्या देखील जाणवत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी, एमआयडीसी प्रशासन यांची विधान भवन पुणे येथे सोमवारी (दि.23) एक बैठक आयोजीत केली होती.

या बैठकीत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी, महासचालक प्रादेशिक वाहतूक अधिकारी, पिंपरी चिंचवड वाहतूक उपायुक्त पिंपरी चिंचवड, विभागीय आयुक्त खेड, राष्ट्रीय महामार्गाचे प्रतिनिधी, सर्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल ट्रेजरर विनोद जैन, मर्सिडीज बेंझचे सारंग जोशी, एमसीसीआय चे अध्यक्ष दीपक करंदीकर आदी  उपस्थित होते.

Pune : नवले पुलाजवळ सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकची धडक, एकाचा मृत्यू

चाकण परिसर हा अत्यंत वेगाने विकसित होणारा औद्योगिक परिसर आहे, त्याचबरोबर रहिवाशी भागाचा विकासही मोठ्या प्रमाणावर या परिसरात होत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उद्योजक व माल इत्यादीची वाहतूक मोठया प्रमाणावर होत असलेले अत्यंत वर्दळीचे ठिकाण आहे.

चाकणमध्ये तळेगाव चौक व आंबेठाण चौकातील वाहतूक कोंडी ( Chakan)  ही अत्यंत ज्वलंत समस्या बनलेली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातील कर्मचारी वेळेवर कामाच्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, कामगारांना कामाचे ठिकाणी पोहोचायला खूप वेळ वाया जातो,   उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होतो, या करिता औद्योगिक संघटनांनी सरकारकडे तक्रारी केल्या होत्या त्यासाठी माननीय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या वाहतूक समस्या तात्काळ सोडविण्यासाठी व त्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजीत केली होती.

या बैठकीत पुढील महत्वाचे निर्णय घेण्यात आले

1)      तळेगाव चौक व आंबेठाण चौक येथील एसटीचे थांबे 100 मीटर पुढे नेण्याचे ठरले.

2)      तळेगाव चौकातील मजूर अड्डा दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे ठरले.

3)      येणाऱ्या सात दिवसात या सर्व परिसरातील अतिक्रमणे काढून टाकण्याचे ठरवले.

4)      रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साठते त्यावर उपाययोजना करण्याचे ठरले.

5)      महाळुंगे येथील पोलीस स्टेशन जवळील ब्रिजचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे ठरले . त्याचबरोबर या ब्रिजवरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी या ब्रिजचे दुरुस्तीचे काम तात्काळ करण्याचे ठरले.

6) प्रभावीपणे वाहतूक समस्या सोडविणे करिता शुक्रवार (दि.27)  संबंधित पोलीस प्रशासन, एमएससीडीसीएल, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे, एमसीसीआयए, नगरपालिका प्रतिनिधी मिळून या रस्त्याचे सर्वे करण्याचे व प्रभावी नियोजन करण्यासाठी अभ्यास करून येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे ( Chakan) ठरले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.