Chakan News : महाळुंगे येथे एकाचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज  – एका तरुणाने दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खून केला. ही घटना गुरुवारी (19 जानेवारी) रात्री पावणे बारा वाजता महाळुंगे-आंबेठाण रोडवर एका किराणा(Chakan News)दुकानासमोर महाळुंगे येथे घडली.

दीपक काशीराम राठोड (वय 35, रा. वाशीम) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. विठ्ठल मंगेश चव्हाण (वय 22, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. अंधबोरी, ता. किनवट, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळकृष्ण पाटोळे यांनी महाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

PCMC : सुट्टीच्या दिवशीही भरा मिळकत कर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विठ्ठल याने दीपक यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगडाने मारून त्यांचा खून केला. ही घटना गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता घडली असून शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खुनाचे कारण अद्याप समोर आले नाही. महाळुंगे(Chakan News) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.