PCMC : सुट्टीच्या दिवशीही भरा मिळकत कर

एमपीसी न्यूज – नागरिकांना मिळकत कर (PCMC) वेळेत भरता यावा, यासाठी मार्च अखेरपर्यंत सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. तसेच, पुढील तीन महिन्यांत थकबाकीदारांवरील जप्तीची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही महापालिकेच्या करसंकलन विभागाने कळविले आहे.

शहरातील मालमत्ता धारकांना ऑनलाइन सुविधांसह 17 विभागीय कार्यालयांत मिळकत कर भरण्याची सोय उपलब्ध आहे. चालू आर्थिक वर्षांत 570 कोटी रुपये करभरणा झाला आहे. मात्र, 31 हजार 971 व्यावसायिक व औद्योगिक मिळकतधारक थकबाकीदार आहेत. त्यांना जप्तीच्या नोटिसा कर आकारणी व कर संकलन विभागाने दिल्या होत्या.

Pimpri : कट मारणाऱ्या रिक्षाचा व्हिडीओ बनविल्याने रिक्षाचालकाचे मुलीशी गैरवर्तन

तीन लाख निवासी मालमत्ताधारकांकडे तब्बल 583 कोटी (PCMC) रुपयांचा कर थकीत आहे. तो वसूल करण्यासाठी 31 मार्चपर्यंत सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करसंकलन कार्यालये व कर भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.