Khed : मुलानेच केली घरात चोरी, वडिलांच्या तक्रारीनंतर मुलाला अटक

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील (Khed) नाणेकरवाडी येथे एका तरुणाने स्वतःच्याच घरात घरफोडी करून एक लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि.18) उघडकीस आली.

निखिल संतोष सालके (वय 19, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी संतोष हनुमंत सालके (वय 48) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : कट मारणाऱ्या रिक्षाचा व्हिडीओ बनविल्याने रिक्षाचालकाचे मुलीशी गैरवर्तन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा निखिल याने घरातील कपाटाच्या लॉकरचा स्क्रू तोडून कपाटातून 6.7 तोळे वजनाचे दागिने आणि 25 हजार रोख रक्कम असा एक लाख 90 हजारांचा ऐवज चोरून नेला.

हा प्रकार 13 ते 18 जानेवारी या कालावधीत (Khed) घडला. याबाबत संतोष यांनी आपल्या मुलाच्या विरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी निखिल याला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.