Guru Nanak Jayanti : गुरु नानक जयंती निमित्त लष्कर भागातील गुरुद्वारा येथे उद्या वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti) निमित्ताने उद्या (मंगळवारी दि. 8) लष्कर भागातील गुरुद्वारा येथे वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात शीख बांधव येतात. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांकडून हा बदल करण्यात येणार आहे.

  1. यामध्ये म्हसोबा मंदिराकडून गुरुद्वाराकडे येणारी वाहतूक ही म्हसोबा मंदिर येथे बंद करुन ती उजवीकडे सरळ पुढे क्विन्स गार्डनकडे पाठविण्यात येईल.

2) बेऊर रोड जंक्शन चौकाकडून गुरुद्वाराकडे जाणारी वाहतूक ही बेऊररोड जंक्शन येथे बंद करून ती वाहतूक ही सरळ बिशप सर्कलकडे पाठविण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत एच. ए. स्कूलला विजेतेपद

3) सेना पोलीस ऑफिसकडून गुरुद्वाराकडे जाणारी वाहतूक ही काहुनरोड येथे बंद करून सदरची वाहतूक ही लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे व विशप सर्कलकडे पाठविण्यात येणार आहे.

हा बदल सकाळी सात पासून गर्दी संपेपर्यंत राहणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहने फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.ना मात्र वाहतुकीसाठी मुभा असणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करत आपली गैरसोय टाळावी असे आवाहन, वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.