राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत एच. ए. स्कूलला विजेतेपद

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषदेच्या मुंबई शाखेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स माध्यमिक स्कूलच्या (H. A. School title) ‘द बिगिनिंग’ या एकांकिकेला चार वैयक्तिक पारितोषिकांसह विजेतेपद मिळाले.

शिक्षक जगदीश पवार यांना लेखन, दिग्दर्शन आणि प्रकाश योजनेसाठी प्रथम क्रमांकाची तीन पारितोषिके आणि सृष्टी पाटील या विद्यार्थिनीला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. आदिती झरकर, सृष्टी पाटील, हर्षदा वाघचौरे, सृष्टी भागवत, ऋषभराज सिंह, सौम्य साबळे आणि तन्वी हनपुडे या विद्यार्थ्यांचा विजयी संघात समावेश होता. रोख एकतीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते.

Talegaon Dabhade : औद्योगिक समन्वयातून विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होत असल्याने नूतन अभियांत्रिकी ठरतंय अव्वल

सहभागी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी अतिरिक्त 15 गुण मिळणार आहेत. मंगल साठे, रमेश गाढवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वृत्तनिवेदिका शिबानी जोशी आणि दिग्दर्शक देवेंद्र प्रेम यांनी स्पर्धेचे परिक्षण (H. A. School title) केले. शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, शालाप्रमुख एकनाथ बुरसे, उपशालाप्रमुख दीपा अभ्यंकर, पर्यवेक्षिका आशा बनसोडे व सुनीता पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.