Talegaon Dabhade : औद्योगिक समन्वयातून विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होत असल्याने नूतन अभियांत्रिकी ठरतंय अव्वल

एमपीसी न्युज – तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाने विद्यार्थी हितासाठी औद्योगिक आस्थापनांशी समन्वय साधत अनेक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट केले आहे. खाजगी, शासकीय आस्थापनांमध्ये नूतन अभियांत्रिकीचे विद्यार्थी काम करत आहेत. (Talegaon Dabhade) यामुळे राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सर्वेक्षणातून नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय उत्कृष्ट ठरले असून डेटाकुईस्ट टी – शाळा रोजगार निर्देशांक सर्वेक्षण 2022 यांच्या वतीने महाराष्ट्रातील पश्चिम भागातील रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयाचा सहावा क्रमांक आला आहे.

औद्योगिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन  गेली वर्षभर सातत्याने विविध आस्थापनांशी  करार केले.विद्यार्थी औद्योगिक जगताशी जोडण्याचे काम यातुन उभे राहिले. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या.

याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सर्वेक्षणातून नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय उत्कृष्ट ठरले आणि डेटाकुईस्ट टी – शाळा रोजगार निर्देशांक सर्वेक्षण 2022 यांच्या वतीने महाराष्ट्रातील पश्चिम भागातील रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयाचा 6 वा क्रमांक आणि विनानुदानित (Talegaon Dabhade) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयाचा 25 वा क्रमांक तसेच शासकीय व निमशासकीय विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोजगार संधी उपलब्ध करण्यामध्ये महाविद्यालयाचा 45 वा क्रमांक प्राप्त होऊन औद्योगिक समन्वय संस्था म्हणून नूतन संस्थेचा गौरव केला.

PCMC : पार्किंग पॉलिसीच्या अपयशानंतर पालिकेचे आता ‘पादचारी आणि सायकल स्नेही’ धोरण

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत होणे यासाठी विविध औद्योगिक समूहासोबत काम करणे अपेक्षित असते. औद्योगिक भेटी,संशोधन कार्य,अंतिम वर्षातील प्रकल्प,(Talegaon Dabhade) उपलब्धीचा एकत्रित वापर, उद्योजकतेचे धडे, कॅम्पस प्लेसमेंट,  इंटर्नशिप आदी मुद्द्यांवर काम करता यावे म्हणून नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाने एकशे चाळीसहुन अधिक अस्थापनांशी सामंज्यस करार केले.

संस्थेचे अध्यक्ष संजय तथा बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,खजिनदार राजेश म्हस्के,  नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.विलास देवतारे,एनसीईआरच्या प्राचार्या डॉ.अपर्णा पांडे आदी मान्यवरांनी आनंद व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.