Talegaon News : नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘बेस्ट इंडस्ट्री ऍकेडेमिया लिंकेज’ पुरस्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्यकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचलित नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट इंडस्ट्री ऍकेडेमिया लिंकेज’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या कार्यपरिक्षणातून महाराष्ट्रातील नूतन महाराष्ट्र (एनएमआयईटी) वर्णी या पुरस्कारासाठी लागली, अशी माहिती ‘टुडे’ संस्थेचे सीईओ पवन कुमार यांनी दिली.

‘अभियांत्रिकी महाविद्यालय आणि अभियांत्रिकी आस्थापना ( इंडस्ट्री) यांच्या एकत्रित कार्यप्रणालीत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिकी शिक्षण मिळू शकते, या विचारातून नूतन संस्था विविध आस्थापनांसोबत काम करत आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी दिली

इंडस्ट्रियल व्हिजीट, प्रोजेक्ट, इंटर्नशिप, उद्योजकांच्या मुलाखती, नोकरीच्या संधी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी प्रशिक्षण आदी माध्यमातून हे काम चालते, अशी माहिती नूतन अभियांत्रिकीचे चेअरमन राजेश म्हस्के यांनी दिली.

या पुरस्काराबद्दल संस्थचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेश शहा आदी पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, इंडस्ट्री इन्स्टिटयूट विभागाचे आणि संबंधित प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.