Science Drama Competition : राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत ‘रमणबाग’ विजेते

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नेहरु सायन्स सेंटर आणि नागपूरच्या गणित व विज्ञान संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या (Science Drama Competition) या वर्षीच्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पुणे विभागातील ‘न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग’ने विजेतेपद पटकाविले. रमणबाग शाळेने ‘कहानी रेबीज वैक्सिन की’ हे नाटक सादर केले होते.

Crime News: जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर कोयत्याने वार

ईशान जबडे या विद्यार्थ्याला या नाटकासाठी  उत्कृष्ट अभिनेता आणि रवींद्र सातपुते या शिक्षकाला उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळाले.(Science Drama Competition) या यशामुळे रमणबाग शाळेची राष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्व विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर विभागातील चिपळूणच्या एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलने दुसरा क्रमांक मिळविला. राज्य विज्ञान शिक्षणसंस्थेचे माजी संचालक नारायण जोशी यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.