Crime News: जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज: मित्राच्या आई आणि बहिणीला शिवीगाळ, मारहाण करणाऱ्या व्यक्तीला गेलेल्या एकावर कोयत्याने वार केल्याची घटना मंगळवारी (दि. 18) रात्री भगतवस्ती, भोसरी येथे घडली.
गौतम गिरीश नाईक (वय 33, रा. भोसरी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास केदारे (रा. भगतवस्ती, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र सनी कदम याच्या आई आणि बहिणीला आरोपी कैलास हा शिवीगाळ व मारहाण करत होता. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मित्र सनी आरोपीकडे गेले. त्यावेळी फिर्यादीचे काहीही न ऐकता कोयत्याने डोक्यात आणि हातावर वार केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.