Pune : मराठी विज्ञान परिषद आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने डॉ. दीपक मोडक यांचे मंगळवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या वतीने राज्याचे माजी मुख्य अभियंता आणि धरण सुरक्षा समितीचे सदस्य डॉ. दीपक मोडक यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘धरणांद्वारे पूर नियंत्रण – मिथक आणि सत्य’ या विषयावर येत्या मंगळवारी (दि.१७ सप्टेंबर) सायंकाळी ६.१५ वाजता शिवाजीनगर येथील दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अनेक गावा-शहरांना पुराचा सामना करावा लागतो. कोल्हापूर-सांगलीचा महापूर आपण काही दिवसांपूर्वी अनुभवला आहे, अशी पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून काय खबरदारी घ्यावी लागेल.

धरणांद्वारे पूर नियंत्रण करणे हे मिथक आहे की सत्य? यासाठी कोणत्या खबरदाऱ्या घेणे आवश्‍यक आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल डॉ. मोडक करणार आहेत. तेव्हा अधिकाधिक विज्ञानप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनय र. र. यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.