Marathi Science Council : अनुवांशिक सिकल सेल ॲनिमियाबाबत जनजागृती गरजेची – डॉ. सुदाम काटे

एमपीसी न्यूज – सिकल सेल ॲनिमिया हा अनुवांशिक रोग असून त्याबाबत जनजागृती करणे अत्यंत आवशअयक आहे, कारण एकट्या महाराष्ट्रातच विशेषतः आदिवासींमध्ये 22.5 टक्के लाकांमध्ये हा आजार (Marathi Science Council) आढळतो, असे प्रतिपादन वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुदाम काटे यांनी केले.

 

 

मराठी विज्ञान परिषद (Marathi Science Council)  पुणे विभागाच्या वतीने ‘सिकल सेल (कोयताकार पेशी) आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केले होते. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, प्रा. विनय र. र., संजीव अत्रे,  डॉ. भोंडवे, अशोक सागर आदी उपस्थित होते.

 

 

डॉ. काटे म्हणाले की, सेल ॲनिमिया दिसून येतो. हा अनुवांशिक रोग आहे. याचे परिणाम गंभीर आहेत. सायप्रसमधील लोकांच्या प्रबोधनामुळे सिकल सेल नियंत्रणात आला. सामाजिक इच्छाशक्ती असेल तर भारतातही तसे करता येईल.
माणसाच्या रक्तात गोलाकार लाल रक्तपेशी शरीरभर ऑक्सिजन पुरवतात. काही स्त्री पुरूषांमध्ये त्यात चंद्रकोरी किंवा कोयत्याच्या आकाराच्या असतात. त्यातून कमी ऑक्सिजन वाहून नेला जातो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील मेंदू, डोळा, हृदय, गर्भाशय अशा अवयवांच्या कार्यात बिघाड होतो. त्यामुळे रक्ताची तपासणी आवश्यक असते. सिकल सेलवर त्रास कमी करणारे औषोधोपचार आहेत. पण ते खर्चिक आहेत. सातपुडा पर्वतातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यामध्ये चार हजाराहून अधिक सिकल सेल बाधीतांवर( Marathi Science Council)  उपचार केले आहेत.

 

 

Pune Crime News : फक्त 6 मिनिटात दुकान फोडून 61 मोबाईल चोरले, पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ

 

 

यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या सिकल सेलचे आरोग्यावर काय परिणाम होतात? हा आजार अनुवंशिक आहे का? अन्य कोणत्या कारणांनी होऊ शकतो का? सिकल सेल बाधीत व्यक्ती कशी ओळखावी? या बाधेवर काही उपाययोजना आहेत का? अशा व्यक्तींनी लग्न – संसार करावा का? आदी प्रश्नांची उत्तरे आणि अधिक माहिती डॉ. काटे यांनी दिली. या प्रास्ताविक अंजली साठे यांनी तर प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.