Pune Crime News : नागरिकांना लुटणाऱ्या तडीपार गुंडाला बेड्या

एमपीसी न्यूज – कुऱ्हाडीचा धाक दाखवून लुटणाऱ्या तडीपार गुंडाला अवघ्या चार तासात पोलिसांनी (Pune Crime News) अटक केली आहे. हि कारवाई शनिवारी (दि. 16) फरसखाना पोलिसांनी केली आहे.

 

Pune Crime News : फक्त 6 मिनिटात दुकान फोडून 61 मोबाईल चोरले, पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ

ऋषभ बाबा पिसे, अनिल बळीराम वाघमारे, मयुर मनोहर गायकवाड (सर्व रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील ऋषभ पिसे याला येरवाडा पोलिसांनी जून 2022 पासून पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरी त्याने शहरात येत लुटमार करण्यास सुरुवात केली.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठ येथे एका नागरिकाला ऋषभ व त्याच्या साथीदारांनी अडवले.यावेळी त्यांनी कुऱ्हाडीचा धाक दाखवून नागरिकांकडून 5 हजार रुपये हिसकावून घेत मारहाण केली. पळून जात असताना नागिराकने त्यांचा पाठलाग करत त्यातील एकाला पकडले व याची माहीती पोलिसांना दिली.यावेळी पोलिसांनी (Pune Crime News) घटनास्थळी जाऊन मनोहर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथिदार अनिल व ऋषभ यांची नावे सांगितली. त्यावरुन पोलिसांनी येरवडा परिसरात लपून बसलेल्या अनिल व ऋषभ याला अटक केली. पोलीस तपासात ऋषभ हा तडीपार असून त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात  जिवे मारण्याचा प्रयत्न, लुटमार, दहशत पसरविणे आदी गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. तिन्ही आरोपी अटकेत असून फरसखाना पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.