Pune Crime News : फक्त 6 मिनिटात दुकान फोडून 61 मोबाईल चोरले, पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ

एमपीसी न्यूज – पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी अवघ्या सहा मिनिटात दुकान फोडले आणि 61 मोबाईल चोरून नेले. या घटनेत चोरट्यांनी 9 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. धायरी परिसरातील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना (Pune Crime News)  घडली. दुकान मालक सचिन दत्तात्रय सांगळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Crime News : पॅरोलवरील 833 कैदी फरार, पोलिसांसमोर शोध घेण्याचे मोठे आव्हान

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रायकरनगर येथे सांगळे टेलिकॉम मोबाईल हब या नावाने दुकान आहे. शनिवारी रात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कटवणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटात त्यांनी दुकानातील 61 मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इतर वस्तू एका पोत्यात (Pune Crime News)  भरून दिल्या. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण तोंड कपड्याने झाकून घेतल्याचे दिसत आहे.

 

 

या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा शहरातील चोरीच्या घटनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पुणे शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अवघ्या सहा मिनिटात चोरी करणाऱ्या या चोरट्यांना पकडण्याचा मोठे आव्हान सिंहगड पोलिसांसमोर आहे. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.