Crime News : गाड्यांची तोडफोड व लुटमार करणारी तीन अल्पवयीन मुले ताब्यात

एमपीसी न्यूज – गाड्यांची तोडफोड करुन नागरिकाला लुटणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना चिंचवड पोलिसांनी (Crime News) ताब्यात घेतले आहे. हि कारवाई रविवारी (दि.17) रोजी करण्यात आली.

 

 

याप्रकरणी बळीराम सुभाष बिराजदार (वय 34 रा. भोसरी) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात (Crime News) घेतले असून त्यांचे इतर 4 ते 5 साथीदार मात्र फरार झाले आहेत.

 

Pune Crime News : नागरिकांना लुटणाऱ्या तडीपार गुंडाला बेड्या

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिराजदार हे शनिवारी (दि.16) चिंचवड येथील रामनगर येथील रोडवर त्यांची पिकअप घेऊन थांबले होते. यावेळी संबंधित अल्पवयीन मुले व त्यांचे साथीदार तेथे आले व त्यांनी फिर्यादीकडून जबरदस्ती 15 हजार रुपये व 5 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतले. तसेच परिसरात उभ्या असलेल्या सात ते आठ गाड्यांची  (Crime News) तोडफोड करत परिसरात दहशत पसरवली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.