Pimpri Corona Update : शहरात आज 6 नवीन रुग्णांची नोंद; 10 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 6 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. (Pimpri Corona Update) तर, कोरोनामुक्त झालेल्या 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 72 हजार 449 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 139 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 135 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pune news : पुण्यात बुधवारी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम होणार : श्रीकांत देशपांडे

तर, महापालिका रुग्णालयामध्ये एकही रुग्ण आज दाखल नाही. (Pimpri Corona Update) आज दिवसभरात 14 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 86 हजार 916 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.