Chikhali : अनधिकृत औद्योगिक पत्राशेडवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या (Chikhali) अतिक्रमण पथकाने कुदळवाडी चिखली रोडवरील सुमारे 47 हजार 500 चौरस फुटावरील अनधिकृत औद्योगिक पत्राशेडवर आज (गुरुवारी) कारवाई करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उपअभियंता सुर्यकांत मोहिते, यांच्या नेतृत्वाखाली कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटील, प्रसाद आल्हाट, प्रियंका म्हस्के, केतकी कुलकर्णी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक योगेश शेवलकर व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस यांच्या नियंत्रणाखाली सदर कारवाई करण्यात आली. गट क्र. 771 मधील कुदळवाडी चिखली रोड, कुदळवाडी नायरा पेट्रोल पंपासमोरील परिसरामधील सुमारे 47 हजार 500 चौरस फुटवरील 6 इंडस्ट्रीएल पत्राशेड अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

Chikhali : सराईत वाहन चोरट्यास अटक

या कारवाईत क क्षेत्रीय (Chikhali) अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक, अग्निशमन दल (चिखली), सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टपऱ्या व पत्राशेड उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.