Chikhali : सराईत वाहन चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी (Chikhali) एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून दोन लाख 70 हजार रुपये किमतीच्या दोन महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 17) करण्यात आली.

संदेश प्रभाकर पाटोळे (वय 23, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याची विकास कामे थांबली – जे.पी.नड्डा

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरात वाढलेल्या वाहन चोरीच्या प्रतिबंधासाठी चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर (Chikhali) यांनी वाहन चोरी विरोधी पथक तयार केले. या पथकाला माहिती मिळाली की, एक तरुण संशयितपणे दुचाकीवरून फिरत असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संदेश पाटोळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख 70 हजार रुपये किमतीच्या केटीएम आणि बुलेट अशा दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.