Chikhali : चिखली परिसरात चोऱ्या करणाऱ्या सराईतांना अटक

एमपीसी न्यूज – चिखली परिसरात वाहन चोरी करून चोरलेल्या वाहनांचा( Chikhali ) वापर करून इतर साहित्य चोरी करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून चार लाख 30 हजारांचा चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिगंबर काशिनाथ जामदारे (वय 19,, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे), प्रतिक गुलाब गोडसे (वय 20, रा. घरकुल, चिखली, पुणे), वैभव संजय कापरे (वय 19, रा. नेवाळे वस्ती, चिखली, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pune : डॉ.पी.ए.इनामदार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना 10 जुलै रोजी रात्री दहा वाजता पूर्णानगर चिंचवड येथे काहीजण रिक्षामध्ये अंधारात साहित्य भरत होते.

त्यांची ही कृती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आणि विचारपूस केली. सुरुवातीला तिघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली असता त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही रिक्षा चोरीच्या असून ते पूर्णानगर येथे बांधकाम साईटवरून बांधकाम साहित्य चोरी करत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी दोन रिक्षा, बांधकाम साहित्य असा एकूण चार लाख 30 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर,

पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, पोलीस अंमलदार साकोरे, सावंत, शिंदे, राठोड, सुतार, पिंजारी, गायकवाड यांनी केली ( Chikhali ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.