Pune : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी रुपेश मोरे यांची निवड

एमपीसी न्यूज – कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारणी 2023-24 नुकतीच जाहीर करण्यात (Pune) आली . त्यामध्ये रुपेश मोरे यांची कोकण खेड युवाशक्तीच्या अध्यक्षपदी निवड केली गेली.  नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार पुण्यातील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेमध्ये  काही मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Pune : ‘आयसीएआय’तर्फे’टॅक्स क्लिनिक’चे आयोजन

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था उपाध्यक्ष  संदीप जाधव व मंगेश घाग तसेच सचिव प्रा. संदीप सकपाळ, सहसचिव समीर चव्हाण, कार्याध्यक्ष संतोष कदम, राहुल ढेबे, खजिनदार नंदकुमार महाडिक, महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्ष कैलास मोरे अशी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम, कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम आणि  युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते.

युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी युवाशक्तीची पुढील वाटचाल कशी असेल आणि अजून युवाशक्तीला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याबाबत मत व्यक्त केले.

त्याचबरोबर कोकणातील पिंपरी चिंचवड पुणे स्थायिक असलेले युवा तरुण पिढीला युवाशक्तीत सामील होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप सकपाळ यांनी केले तर आभार सूरज उत्तेकर यांनी (Pune)  मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.