Pune : ‘आयसीएआय’तर्फे’टॅक्स क्लिनिक’चे आयोजन

एमपीसी न्यूज – दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखा आणि डायरेक्ट टॅक्स कमिटी यांच्या वतीने व प्राप्तिकर विभागाच्या सहकार्याने ‘टॅक्स क्लिनिक’चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 13 जुलै व शुक्रवार, दि. 14 जुलै 2023 या दोन दिवशी आयसीएआय भवन, बिबवेवाडी येथे करदात्यांसाठी ‘टॅक्स क्लिनिक’ हा उपक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल यांनी दिली.

Gold Rates – आजचे सोने-चांदी भाव

‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “टॅक्स क्लिनिक हा उपक्रम देशभरातील सर्व 168 शाखांमध्ये राबविण्यात येत असून, या उपक्रमाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता होणारआहे.

या उपक्रमांत कर विषयक जागृती, कर अनुपालन व प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यात येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

दोन्ही दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 6वाजेपर्यंत सनदी लेखापाल करदात्यांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. अधिकाधिक करदात्यांनी या विनामूल्य सुविधेचा लाभ (Pune) घ्यावा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.