Talegaon : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव (Talegaon)  दाभाडे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 11) पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडली.

Pune : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी रुपेश मोरे यांची निवड

पोलीस नाईक किरण मदने यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव दाभाडे येथील काळोखे पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालक पळून गेला आहे. तळेगाव (Talegaon ) दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.