Chikhali : गणेश मंदिरात नवरात्री निमित्त कन्यापूजन

एमपीसी न्यूज – नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने (Chikhali) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने चिखली मधील फुलेनगर येथील गणेश मंदिरात कन्यापूजन आणि होमहवन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले.

नवरात्र उत्सवात कुमारिका पूजनाला महत्व आहे.( Chikhali )गणेश मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहा महिन्यांपासून ते बारा वर्ष वयोगटातील मुलींचे विधीवत पूजन करून स्त्री शक्तीला नमन करण्यात आले. यावेळी फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली.

Pimpri : चालू आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात 65 टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर

मुलींची पाद्यपूजा करून त्यांचा शृंगार करत औक्षण झाले. त्यानंतर प्रसादाचे वाटप झाले. याच कार्यक्रमात ‘मुलगा मुलगी सामान-दोघांनाही शिकवू छान, भृणहत्या करू नका’, असे संदेश देण्यात आले. राजेंद्र देसले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, श्री गणेश महिला भजनी मंडळ सदस्य व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.