Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ मंदिरात नवरात्रौत्सवात विद्यार्थिनींचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज – तळेगाव येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज ( Talegaon Dabhade) मंदिरात नगरपरिषदेच्या सर सेनापती उमाबाई दाभाडे शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थिनींनी नवरात्र उत्सवात आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थिनी व शिक्षकांनी भोंडला, दांडिया, फुगड्या खेळून हा आनंद साजरा केला. महिलांनी विद्यार्थिनींचे पूजन करून त्यांना सन्मानित केले.

डोळसनाथ महाराज मंदिरातील शारदिय नवरात्रोत्सवात तळेगाव दाभाडे नगर परिषद,सरसेनापती उमाबाई दाभाडे,शाळा क्र-4च्या विद्यार्थिनी भोंडला,दांडीया,व फुगड्या  खेळून आनंदोत्सव साजरा केला.

मंदीर परिसातील महिला भगिनींनी कुमारिका पूजन करुन सर्व मुलींना एक पेन दिले व शिक्षकवृंदासह हळदी-कुंकु समारंभ केला. यावेळी अनिता तिकोने, निकीता शितोळे,जयश्री पावसे, वैशाली साबळे,साबळेसर उपस्थित होते.

Pimpri : चालू आर्थिक वर्षातील साडेसहा महिन्यात 65 टक्के मालमत्ता धारकांनी भरला कर

मंदिरात नवरात्रीनिमित्त रोज दुर्गा सप्तशतीचे पाठ , स्वामी समर्थ केंद्र कडोलकर  कॉलनी यांचे श्री सुक्त पठण , नवार्नव मंत्र, देवीचे जप, 5 ते 6 भजन व हरिपाठ , श्री डोळसनाथ भजनी मंडळाची 6 ते 7 देवीची गाणी, जोगवा व 8:00 वा श्रींची व संबळाच्या निनादात देवीची आरती  होत असते.

नवमीला नवचंडी याग (हवन) व दसऱ्याला  छबिना पालखी सायंकाळी  6.00 वा मंदिरातून नगारा, टाळ मृदंगाच्या गजरात,भजनी मंडळ व ग्रामस्थांसमवेत ग्राम प्रदक्षिणेसाठी निघेल. पुन्हा मंदिरात आल्यावर श्री व देवीची  ( Taleg,aon Dabhade) आरती होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.