Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भोंडला खेळ रंगला

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ( Talegaon Dabhade ) प्रीप्रायमरी सेक्शन व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी भोंडला खेळाचे आयोजन केले होते. पारंपारिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. भोंडला व गरबा खेळण्यात विद्यार्थी रमले.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ मंदिरात नवरात्रौत्सवात विद्यार्थिनींचा आनंदोत्सव

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने व द्वीप प्रज्वलनाने झाली. यावेळी खजिनदार गौरी काकडे यांनी नवरात्रीचे महत्त्व विषद केले व सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

शाळेच्या मुख्याध्यापिका  मीना अय्यर यांनी नवरात्री उत्सवाची माहिती दिली. यावेळी सोनल काकडे,  सुप्रिया काकडे, शाळेच्या पर्यवेक्षिका ज्योती सावंत,रमा बागुल,कीर्ती कुलकर्णी व मीरा चव्हाण उपस्थित होत्या.

यावेळी उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या हस्ते पाटावरील हत्तीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  यानंतर’ ऐलमा पैलमा’ अशी भोंडल्याची गाणी म्हणत विद्यार्थ्यानी  हत्तीच्या प्रतीमेभोवती फेर धरला.

प्रीप्रायमरी सेक्शन मधील व इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. सर्वांनी गरबा नृत्य केले. या खेळाचा सर्व शिक्षक व विद्यार्थ्यानी  ( Talegaon Dabhade ) आनंद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.