Pune : चित्तरंजन वाटिका उद्यानातून दोन चंदनाची झाडे चोरीला

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथील चित्तरंजन वाटिका उद्यानातून (Pune) चोरट्यांनी दोन चंदनाच्या झाडाचे बुंधे चोरून नेले. ही घटना 22 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्यानाचे सुरक्षा रक्षक शामराव पवार (वय 39, रा. वडगाव खुर्द, पुणे) यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ मंदिरात नवरात्रौत्सवात विद्यार्थिनींचा आनंदोत्सव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार हे पुणे महापालिकेच्या (Pune) चित्तरंजन वाटिका उद्यानात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. 21 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते 22 सप्टेंबर रोजीस अकाली सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी उद्यानात बांबूच्या बेटा शेजारी असलेल्या दोन चंदनाच्या झाडाचे आठ हजार रुपये किमतीचे बुंधे कापून चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.