Chikhali News : चिखलीतील श्री नागेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज चिखली येथील श्री नागेश्वर विद्यालयाच्या (Chikhali News) 2005-2006 या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. 

यावेळी वी एम शिंदे. काकडे, पंडित सर व पंडित मॅडम, भगवत, सस्ते, पी.बी. शिंदे,जमदाडे, लोखंडे तसेच माजी शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

Vakad News : वाकड येथे मुंबई- बेंगलुरू हायवेवर ऑइल टँकर पलटला

अमर जाधव  अमृत  नेवाळे हे दोन विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या सेवेत कार्यरत असल्यामुळे त्यांचे सत्कार करण्यात आले . शाळेच्या  प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले, शाळे साठी लागणार्या वस्तू, प्रत्येक वर्गात 20 फॅन, लाईट,झाडांना पाणी देण्यासाठी पाईप देण्यात आले, मग विद्यार्थी व शिक्षकांनी आपले  मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा दिला , शिक्षकांच्या  डोळ्यातून (Chikhali News)  आठवणीत कायम असणारे विद्यार्थी, खोडकर, हुशार  मुलांच्या आठवणीत अश्रू अनावर झाले, स्नेहभोजन करताना शिक्षकांवरील प्रेम प्रत्येक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन 2006 च्या 10 वी ई आणि  फ या 2 तुकड्याच्या विद्यार्थ्यांनी पार पाडले.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी सागर  लोखंडे, राजेश डोंगरे, विशाल  बनकर, विनायक गोसावी, बापू सरोदे, शेखर  रोकडे , समीर  मोरे प्रमोद घनवट, स्वाती कुऱ्हाडे, जयश्री पांडव,यांनी सर्वांनी परीश्रम  घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार  काळुराम शिंदे, मिथुन गोसावी, यांनी पार पाडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.