Talegaon News : अल्पवयीन मुलगा राँग साईडने जाऊन थेट पोलिसांच्या गाडीला धडकला

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलगा त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने जाऊन तो थेट पोलिसांच्या गाडीलाच (Talegaon News) धडकला. ही  घटना 1 जानेवारी रोजी दुपारी आंबी गाव येथील वडगाव फाटा रोडवर घडली.

याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश शंकर मरागजे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली असून 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Chikhali News : चिखलीतील श्री नागेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलगा हा त्याच्या ताब्यातील एमएच 12 ए.एस.7883 ही दुचाकी राँग साईडने भरधाव वेगात घेऊन येत असताना तो थेट फिर्यादी यांच्या कारला धडकला. या अपघतात तो स्वतः व संदिप जाधव (वय 15) हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात (Talegaon News) गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.