Pimpri News : युवा पिढीतील वाढती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांमार्फत जनजागृती मोहीम

एमपीसी न्यूज : व्यसनाच्या  वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. या विनाशकारी वादळाला वेळेत थांबवणे गरजेचे आहे. (Pimpri News) युवा पिढीतील वाढती व्यसनाधीनता कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कंबर कसली असून शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

याबाबत माहिती देताना, परिमंडळ- 2 चे पोलीस उप आयुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त मनोज कुमार चौबे आणि अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम पोलीस रेजिंग डे च्या निमित्ताने सुरु करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत 18 पोलीस स्टेशन्स आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्याचा एका प्रतिनिधी अधिकरी असे एकूण 18 अधिकाऱ्यांना विश्रांतवाडी येथील मुक्तांगण केंद्रामध्ये व्यसन मुक्ती करण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे अधिकारी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ सेवन करू नये या संदर्भात जनजागृती करत आहेत.

याविषयी अधिक माहिती देताना, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सतिष पवार, म्हणाले की, पूर्वी अंमली पदार्थांचे सेवन फक्त श्रीमंत युवक करत असत. (Pimpri News) पण आता त्याचे सेवन सामान्य युवक सुद्धा करत आहेत. त्यामुळे अंमली पदार्थांचे सेवन वाढले असून त्यामुळे त्याचे दुष्परीणाम समाजात वाढले आहेत. हे दुष्परीणाम कमी करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवण्याची गरज आहे. नवीन पिढीला त्यांच्यापासून दूर ठेवायचे आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्या मध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.

Chikhali News : चिखलीतील श्री नागेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी रेजिंग डे च्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाला अंमली पदार्थांचे युवा पिढीतील सेवन कमी करण्यासाठीचे उपाय योजना करण्यास सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याचा एक प्रतिनिधी अधिकारी असे 18 पोलीस ठाण्यांच्या 18 अधिकाऱ्यांना एका दिवसाचे प्रशिक्षण मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये घेण्यात आले होते.

त्यामध्ये माणसामध्ये व्यसन कसे सुरु होते, त्याचे दुष्परीणाम काय आणि व्यसनमुक्ती कशी करायची या बद्दल पावर पॉइंट प्रेझेंटेशन व व्याख्याना द्वारे माहिती देण्यात आली.

त्यानंतर हे प्रशिक्षित अधिकारी त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध जनजागृती करत आहेत. ही जनजागृती शाळेतील 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी व महाविद्यालयातील 11वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येत आहे.

त्यासाठी संबंधित शाळा व महाविद्यालयांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या आवारात 1.5 तासाचे सत्र घेण्यात येते. या सत्रामध्ये मुक्तांगण, स्माईल फाउंडेशन व विमल फाउंडेशन यांचे व्याख्याते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. माणसामध्ये व्यसन कसे सुरु होते, त्याचे दुष्परीणाम याबद्दल माहिती देण्यात येते.

या मोहिमेचा एक भाग म्हणून स्माईल फाउंडेशन, विमल फाउंडेशन व न्यू इंग्लिश स्कुल यांच्या वतीने शनिवारी 7 जानेवारी 2023 चिंचवड येथे रॅली काढण्यात आली.(Pimpri News) यामध्ये न्यू इंग्लिश स्कुल यांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ह्या रॅली मधील विद्यार्थ्यांनी  चिंचवडगावातील विविध भागात फिरून घोषणा देऊन जनजागृती केली. चिंचवड गावातील चाफेकर चौकामध्ये पथनाट्य सादर करून या रॅलीच्या समारोप करण्यात आला होता.

आता पर्यंत 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 25 शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ सेवनाचे विरोधात विद्यार्थ्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.