Pimpri News : ‘सिंधी प्रीमियर लीग’ रंगणार 2 फेब्रुवारीपासून

एमपीसी न्यूज –  देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, त्यांच्यात तंदुरुस्ती विषयी जागरूकता व्हावी, तसेच मोबाईल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावर खेळण्याला प्राधान्य द्यावे आणि खेळातून उभारलेल्या निधीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा 2 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पिंपरी येथे (Pimpri News)रंगणार आहे. यंदाच्या चौथ्या हंगामात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत.

पिंपरी येथील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही स्पर्धा होणार, त्याचे थेट प्रक्षेपण सिंधी प्रीमिअर लीग फेसबुक पेजवरून पाहायला मिळणार आहे. स्पर्धेतून मिळालेला निधी सामाजोपयोगी आणि विधायक कामासाठी देण्यात येतो. यंदा या निधीतून एएनपी केअर फाउंडेशनला डायलेसिस मशीन भेट देण्यात येणार असल्याची माहिती कन्वल खियानी, हितेश दादलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कमल जेठानी, अंकुश मुलचंदानी, नरेश नशा, करण अस्वानी, अवि तेजवानी, अवि इसरानी, कुणाल गुडेला, पियुष जेठानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.

Sangavi Crime News : गाडी खरेदीच्या व्यवहारात एकाची साडे चार लाखांची फसवणूक

हितेश दादलानी म्हणाले, “पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रातील उद्योजक तरुणांनी एकत्र येऊन या क्रिकेट लीगचे आयोजन केले आहे. ‘सिंधी प्रीमियर लीग सीजन 4’चे उद्घाटन 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. यावेळी माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच खेळाडू, संघ मालक व कुटुंबीयांची उपस्थिती असणार आहे. ही स्पर्धा देशातील सर्व सिंधी समाजपर्यंत पोहचवायची आहे. एक दिवस जगभरातील सर्व सिंधी समुदायांना आपापल्या शहरांमध्येही अशी स्पर्धा आयोजित करता यावी, हा यामागचा उद्देश आहे. ‘सिंधी फक्त व्यवसायापुरतेच आहेत’ हा समज खोडून काढावा यासाठीही आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.”

कन्वल खियानी म्हणाले, “गेल्या तिन्ही मोसमात झालेल्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जवळपास 11 लाख लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. यंदा स्पर्धेला व्यापक स्वरूप येत असून, पुण्यासह परभणी, जळगाव, नांदेड येथूनही खेळाडू सहभागी होत आहेत. आयपीएलच्या धर्तीवर या स्पर्धेची रचना करण्यात आली आहे. 16 संघमालक आपल्या 16 संघांसह स्पर्धेत उतरणार आहेत. आपली संस्कृती साजरी करणे आणि त्याचा प्रसार करणे हेही यामुळे साध्य होणार आहे. त्यातून सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वंचितांच्या शिक्षणासाठी, विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”

या स्पर्धेतील प्रत्येक संघाचे नाव सिंधी समाजाशी आणि संस्कृतीशी निगडित आहे. त्यामध्ये मस्त कलंदर (गीता बिल्डर्स, मयूर तिलवानी), सुलतान ऑफ सिंध (आशुतोष चंद्रमणि, चंद्रमणि असोसिएट्स), मोहेंजोदरो वॉरियर्स (मिलेनियम सेमीकंडक्टर, हरीश अभिचंदानी), सिंधफूल रेंजर्स (अनूप झमतानी, झमटानी ग्रुप), एसएसडी फाल्कन (विकी सुखवानी, सुखवानी लाइफस्पेस), इंडस डायनामॉस (सुमित बोदानी, शगुन टेक्सटाईल), दादा वासवानीज ब्रिगेड (अनिल अस्वाणी, अस्वाणी प्रमोटर अँड बिल्डर), झुलेलाल सुपरकिंग्ज (पियुष जेठानी, जेठानी ग्रुप), हेमू कलानी ग्लॅडिएटर्स (बिपिन डाखनेजा, ट्रिओ ग्रुप), गुरुनानक नाइट्स (प्रकाश रामनानी, पीव्हीआर टाईल्स वर्ल्ड), संत कंवरम रॉयल्स (क्रिश लाडकानी, विजयराज असोसिएट्स), आर्यन युनायटेड (राजीव मोटवानी, रोहित इन्फ्रा), जय बाबा स्ट्रायकर्स (सागर सुखवानी, सुखवानी असोसिएट्स), सिंधी इंडियन्स (मनीष मनसुखवानी, मनसुखवानी असोसिएट्स), अजराक सुपरजायंट्स (हितेश दादलानी, लाइफक्राफ्ट रियल्टी) व पिंपरी योद्धाज (कुणाल लखानी, सोहम मोबाईल) अशी या संघांची नावे आहेत. स्पर्धेत 16 संघ असून 243 खेळाडूंची नोंदणी झालेली आहे. संघ विकत घेतलेल्या मालकांकडून 25 लाख आभासी (व्हर्च्युअल) चलनातून या खेळाडूंचा लिलाव करण्यात आला.

Charholi News : पेटीएम केवायसी च्या बहाण्याने एकाला 49 हजार रुपयांचा गंडा

सुखवानी लाईफ स्पेसेस (विकी सुखवानी), एएनपी कॉर्प (ऋषी अडवाणी), नुरिया होमेटेल हॉस्पिटॅलिटी (सागर सुखवानी), एसएम ग्रुप (सागर मुलचंदानी), रवि बजाज आणि रोहित तेजवानी, रिशा वॉच स्टोअर (जॅकी दासवानी), तेजवानी हॅण्डलूम्स अँड फर्निसिंग्स (अवि तेजवानी), सेवानी इन्शुरन्स (हर्ष सेवानी), उत्तम केटरर्स (नवजीत कोचर), एसएसडी एक्स्पोर्ट हॉंगकॉंग लिमिटेड (वरून वर्यानी), कोमल असोसिएट्स (बग्गी मंगतानी), लीगसी ग्रुप (नरेश वासवानी), बालाजी होम्स (आशुतोष चान्दिरमणी), क्लासिक कलेक्शन (नीरज चावला), जीएस असोसिएट्स (जितू पहलानी), साईबाबा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड (रोहन गेहाने), रजनीता इव्हेंट्स (निखिल अहुजा), देवी काँक्रीट प्रोडक्ट (जितेश वनवारी), सिटी कार्स (रॉकी सेवानी), ग्लो वर्ल्ड (महान जेस्वानी), जय मोबाईल (गोपी आसवानी) यांचे या स्पर्धंसाठी सहकार्य लाभले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.