Sangavi News : धनगर समाजाची प्रगती करण्यासाठी अगोदर समाजाचा इतिहास वाचा – प्रा. यशपाल भिंगे

एमपीसी न्यूज – आपलेच काही सुशिक्षित लोक आपल्याच समाजाच्या इतिहासाकडे पाहत नाहीत. सुशिक्षित वर्ग अजूनही समाजाबद्दल बोलत नसतो. (Sangavi News) माझ्या आत्तापर्यंतच्या यशामागे, प्रगतीमागे समाजाचा सहभाग असल्याचे मी कबूल करतो. समाजाची प्रगती करायची असेल. तर, आपला समाजाचा इतिहास पाहिला पाहिजे, वाचला पाहिजे, असे मार्गदर्शन धनगर समाजाचे विचारवंत, इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. यशपाल भिंगे यांनी केले.

पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय  15 वा वधु-वर मेळावा उत्साहात पार पडला. नवी सांगवीतील रामकृष्ण मंगल कार्यालयात रविवारी (दि.8) झालेल्या मेळाव्याला माजी राज्यमंत्री, आमदार दत्तामामा भरणे, विधान परिषदेचे आमदार राम शिंदे,  नांदेड येथील मौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. यशपाल भिंगे, उज्वला हाके, संघाचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर, सचिव विजय भोजने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, दिवंगत विशाल कुचेकर,  दिवंगत सौ.प्रमिला बिडगर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन मेळाव्याला सुरुवात झाली. मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे प्रकाशन करण्यात आले.

राम शिंदे म्हणाले, ”धनगर समाजसेवा संघातर्फे समाज सेवा कार्याच्या माध्यमातून समाज सेवा करण्याची संधी लाभली आहे. त्याचा आपण केवळ लग्न जमविण्यापुरताच उपयोग करु नये. समाजासाठी काम करुन समाजाप्रती आपले दायित्व सिद्ध करण्याची संधी आहे”.

Pune News : पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, दहा दिवसात दुसऱ्यांदा तोडफोड

दत्तात्रय भरणे म्हणाले, ”धनगर समाज सेवा संघामुळे तुम्हाला समाज सेवेची संधी मिळत आहे. ताण-तणावामध्ये न राहता यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. मेळाव्यास सर्वांनी आनंदाने यावे आणि आनंदाने जावे. सध्या धनगर समाजात वेगवेळे वधू-वर मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. (Sangavi News) सोलापूर, बारामती, पुणे, मुंबई अशा ठिकाणी विविध मेळावे घेतले जात आहेत. समाजसेवा करावी. पोटजाती विसरुन मुलामुलींची लग्ने जमवावीत”.

या मेळाव्याचे प्रस्ताविक संघाचे अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर यांनी केले. दुपारी जेवणानंतर वधूवरांच्या पालकांची एकमेकांशी ओळखी वाढत जावून लग्न जमविण्याबाबत सकारात्मक चर्चा घडल्या.  मेळाव्याच्या संयोजनात अध्यक्ष मुकुंदराव कुचेकर, कार्याध्यक्ष दिलीप काटकर, सचिव विजय भोजने, खजिनदार अभिमन्यू गाडेकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र पिसे, संचालक गणेश लंबाते, राजेंद्र कवितके, विठ्ठल कडू, दर्शन गुंड, पांडुरंग उराडे, भास्करराव गाडेकर, रमेश सावळकर, रोहिदास गोरे यांनी पुढाकार घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.