Charholi News : पेटीएम केवायसी च्या बहाण्याने एकाला 49 हजार रुपयांचा गंडा

एमपीसी न्यूज पेटीएम ची केवायसी करायची आहे सांगून (Charholi News) ओटीपी घेत 49 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. हा प्रकार चऱ्होली येथे 19 सप्टेंबर रोजी घडला आहे.

याप्रकरणी सुरेश रावजी म्हसे (वय 57 रा. चऱ्होली) यांनी रविवारी (दि.8) फिर्याद दिली असून मोबाईल नंबर 7657026296, 9693870976 व 8097716311 या मोबाईल क्रमांक धारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : पिंपरी चिंचवडकरांनाअंगारकी निमित्त 1005 रुपयात अष्टविनायकची यात्रा करण्याची संधी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फोनवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मॅसेज आला की पेटीएम खात्याची केवायसी करायची आहे, त्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा, फिर्यादी यांनी लिंक ओपन करताच पेटीएम अप्लीकेशन ओपन झाले, तिथे त्यांनी ओटीपी मागितला, (Charholi News) फिर्यादी यांनी ओटीपी टाकताच त्यांच्या खात्यातून 49 हजार रुपये काढून घेण्यात आले. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.