Pune Winter : पुणे गारठले; 8.6 अंश सेल्सिअसवर गेले तापमान

एमपीसी न्यूज : पुण्यामध्ये थंडीचा जोर वाढला (Pune Winter) असून 29 दिवसांनंतर पुण्यामध्ये पहिले एकल-अंकी तापमान 8.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी किमान तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आज पुणे गारठले आहे. देशाच्या उत्तर व पूर्व भागात दिल्लीसह मैदानी प्रदेशात सध्या तीव्र थंडीची लाट आली आहे.

तर, पुण्यामध्ये इतर भागातही 8.6 सेल्सिअस तापमानाच्या आसपास तापमान आहे. पाषाणमध्ये 8.9 सेल्सिअस, तर NDA मध्ये 8.3 सेल्सिअस, हडपसरमध्ये 12.8 सेल्सिअस तापमान आहे.

Pimpri News : पिंपरी चिंचवडकरांना अंगारकी निमित्त 1005 रुपयात अष्टविनायकची यात्रा करण्याची संधी

उत्तर भारतात परसलेल्या थंडीच्या लाटेमुळे दिल्ली शहरात हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचाच फटका महाराष्ट्राला मिळत आहे. मागील काही दिवस नागरिकांना थंडी व ढगाळ वातावरण अशा दोन्ही गोष्टी अनुभवायला मिळाले असून शनिवारपासून आकाश निरभ्र झाले आहे. मात्र थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. ही थंडीची लाट येत्या शनिवार म्हणजे 14 जानेवारी पासून ओसरून तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोवर नागरिकांनी थंडीपासून बचाव करावा असे आवाहन (Pune Winter) हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.