Pimpri News : पिंपरी चिंचवडकरांनाअंगारकी निमित्त 1005 रुपयात अष्टविनायकची यात्रा करण्याची संधी

एमपीसी न्यूज – उद्या अंगारकी संकष्ट चतुर्थी साठी अवघ्या 1,005 रुपयात अष्टविनायकची दोन दिवस यात्रा ( Pimpri News) करण्याची संधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच सर्वांच्या परिचयाची एस टी च्या पिंपरी आगाराने पिंपरी चिंचवडकरांना उपलब्ध करून दिली आहे. 

यासाठी साध्या बस ची सोय करण्यात आली आहे. प्रौढ व्यक्तीला प्रत्येकी 1,005 रुपये तर मुलांना प्रत्येकी 505 रुपये प्रवास खर्च आहे. या बसची आसनक्षमता 40 आहे.

ही बस पिंपरी एस टी आगारातून सकाळी 7 वा सुटेल. ती शिवाजीनगर (वाकडेवाडी) बस स्थानक, स्वारगेट बस स्थानक येथे थांबेल. पुढे ती बस थेऊर, मोरगाव, सिद्धटेक रांजणगाव ओझर या ठिकाणे थांबेल. तेथे गणपती दर्शनानंतर ती ओझर येथे रात्रीचा मुक्काम करेल. प्रवाशांनी राहण्याचा व जेवणाचा खर्च स्वतः करायचा आहे.

Maval : क्रिकेट मॅचमध्ये भांडणात स्टंप व बॅटने मारामारी

बुधवार, 11 जानेवारी रोजी लेण्याद्री, महड, पाळी या ठिकाणी थांबून तेथील गणपतीचे दर्शन घेता येईल. संध्याकाळी बस पिंपरी ला परत येईल.

एस टी च्या बसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 5 बस चे बुकिंग पुर्ण झाले आहे. 6व्या बसचे बुकिंग चालू आहे. नागरिकांना ग्रुप बुकिंग तसेच पुर्ण बस देखील बुक करण्याची सुविधा आहे. त्यामुळे एस टी प्रशासनाने नागरिकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( Pimpri News )तसेच अधिक माहितीसाठी पिंपरी आगाराशी संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.